बालभारतीचा अजब कारभार,एकवीस ऐवजी वीस एक…दुसरीच्या पुस्तकात अचानक बदल:शिक्षण क्षेत्रात खळबळ

2

मुंबई ता.१७: बालभारतीच्या वतीने दुसरीच्या पुस्तकात अचानक बदल करण्यात आला आहे.त्यात एकवीस ऐवजी  वीस एक तसेच तेवीस ऐवजी वीस तीन असे शब्द आता वाचण्यात येणार आहे.लहान मुलांना जोडाक्षरे वाचताना संभ्रम निर्माण होतो त्यामुळे हे बदल करण्यात आले आहे असे बालभारतीच्या अधिकारी मंगला नारळीकर यांचे म्हणणे आहे. मात्र या पद्धतीवर शिक्षण तज्ञा कडून टीका होत आहे. हा बदल म्हणजे मुलांच्या पचनी पडणारा नाही. तसेच थेट दुसरीत हा बदल करण्यात आल्यामुळे मुलांच्या लक्षात येणार कसे असा प्रश्न शिक्षकांना आहे. तर हा बदल एच्छिक असून बंधनकारक नाही असे बालभारतीचे म्हणणे आहे. त्यामुळे आता हा नेमका बदल कशाप्रकारे विद्यार्थी व शिक्षक स्वीकारतात की याला विरोध केला जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

5

4