वि. मं. करुळ गावठण अ प्रशालेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप

2

वैभववाडी प्रतिनिधी ; शाळेच्या पहिल्यादिवशी वि. मं. करुळ गावठण अ प्रशालेत मुलांना मोफत गणवेशचे वाटप करण्यात आले. समग्र शिक्षा अभियांनांतर्गत याही वर्षी मुलांना मोफत गणवेश मंजूर झाले आहेत. शाळा व्यवस्थापन समितीने या योजनेतून गणवेश विद्यार्थ्यांना वितरित केले आहेत. तसेच यावेळी नवोगंतांचे स्वागत व सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकेही वितरित करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रविंद्र पवार उपस्थित होते. तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक कोलते, यशवंत कोलते, अवंतिका साटम, दिपक लाड, संदीप कोलते, मुख्याध्यापक नवनाथ सगरे, शिक्षिका ताई व्हनाले व समिती सदस्य, महिला, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी रविंद्र पवार म्हणाले, विविध स्पर्धा परीक्षा व क्रीडा क्षेत्रात या शाळेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या शाळेचे नाव जिल्हा व राज्यस्तरापर्यंत पोहोचले आहे. शाळा समिती व शिक्षकांचे यात योगदान फार मोठे आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी पालक कायम आहेत. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण आल्यास सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. मात्र शिक्षण घेवून चांगले यश संपादन करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे. शिक्षक व पालक यांच्यातील योग्य समन्वय यापुढेही कायम राहील्यास शैक्षणिक प्रगती अधिक होईल असे सांगितले. इयत्ता पहीली मध्ये नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. इयत्ता चौथी पर्यंत च्या २१ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात आले. मुलांना पहिल्याच दिवशी गणवेश प्राप्त झाल्याने त्यांच्यात आनंदी वातावरण दिसत होते. तर पहिल्याच दिवशी करण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाबाबत पालक व शिक्षण प्रेमींनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार नवनाथ सगरे यांनी मानले.

4