स्वप्नांना कष्टाचे बळ द्या: सतीश सावंत, जांभवडे येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न

127
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
कष्टातून घेतलेल्या शिक्षणाची पाळेमुळे खोलवर जातात .कष्ट करून ज्यांनी शिक्षण घेतलं. ती मुले शिक्षण क्षेत्रात पुढे गेलेली आहेत. कष्ट करण्याची सवय ठेवा .कष्टातून चांगला अनुभव मिळतो . आपल्या जीवनातील स्वप्नांना कष्टाचं बळ द्या आणि आपलं पुढील आयुष्य उज्वल बनवा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी जांभवडे येथे केले.
कुडाळ तालुक्यातील जांभवडे गावातील जांभवडे हायस्कुल यथे इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवत्ता प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करियर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सतीश सावंत बोलत होते .या सोहळ्यास जांभवडे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुभाष मडव ,प.स. सदस्य बाळकृष्ण मडव, बाबा वर्देकर, जांभवडे सरपंच अर्चना मडव, सोनवडे सरपंच उत्तम बांदेकर, बाळा राणे, दिलीप तवटे, जांभवडे हायस्कुल चे मुख्याद्यापक एस. एस. सावंत, लवू घाडी, आत्त्माराम गुरव, नारायण गावडे, टी .टी . सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.