जमिनीच्या वादातून प्रकार :कडक कारवाईची ग्रामस्थांची पोलिसांकडे मागणी
बांदा, ता.१७:बांदा सरपंच मंदार कल्याणकर यांच्यावर जमिनीच्या वादातून भ्याड हल्ला व मारहाण ही निषेधार्य असून याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी भाजपाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी बांदा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक योगेश जाधव यांचेकडे केली. यावेळी बांदा ग्रामस्थांनी देखील हल्लेखोरावर कडक शासन करण्यासाठी निवेदन दिले.
रविवारी सकाळी जमिनीच्या वादातून सरपंच कल्याणकर, भाऊ समीर, वहिनी आसावरी, वडील दिनकर कल्याणकर यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला असून सरपंच कल्याणकर यांच्यावर झालेला हल्ला हा संपूर्ण गावावर झालेला हल्ला असल्याचे ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सचिन नाटेकर यांनी सांगितले की, सरपंच हा गावचा प्रथम नागरिक असतो. सरपंच कल्याणकर यांच्या जमिनीत अतिक्रमण झालेले आहे. ही बाब न्यायप्रविष्ट आहे. नेहमीच गावाचा विचार करणाऱ्या कल्याणकर यांनी कधीही वैयक्तिक स्वार्थ साधला नाही. त्यामुळे त्यांच्या सरपंच पदाचा गैरफायदा घेण्यात येत आहे. यासाठी ग्रामस्थ म्हणून आम्ही कल्याणकर यांच्या पाठीशी ठामपणे राहणार असल्याचे नाटेकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, शीतल राऊळ, माजी सरपंच बाळा आकेरकर, प्रियांका नाईक, अनुजा सातार्डेकर, ग्रामपंचायत सदस्य उमांगी मयेकर, राजेश विरनोडकर, भाऊ वाळके, सुधीर शिरसाट, शाम काणेकर, मंगलदास साळगावकर, प्रवीण नार्वेकर, साईराज साळगावकर, शशिकांत पित्रे, सुनील धामापूरकर, निलेश सावंत, सचिन वीर, नितेश पेडणेकर, गौरव गवंडी, निलेश केसरकर, आदित्य शिरोडकर, पांडुरंग नाटेकर, सचिन नाटेकर, शिवप्रसाद बांदेकर, दत्तात्रय आईर, सागर हरमलकर, आनंद कल्याणकर आदी उपस्थित होते.