संयुक्त दशावतार नाटकाच्या माध्यमातून वृद्धाश्रमाला मदत ;खानोली रवळनाथ प्रतिष्ठानचा पुढाकार

265
2

वेंगुर्ले : ता. १७
संयुक्त दशावतार नाटकाच्या माध्यमातून मिळालेल्या देणगीतून आनंदाश्रय वृद्धाश्रमला भरघोस मदत करण्यात आली. रवळनाथ प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांनी सदर मदतीचा धनादेश अणाव येथील जीवन सेवा ट्रस्टच्या आनंदाश्रयमधील व्यवस्थापकांकडे सुपूर्द केला.
अणाव येथील आनंदाश्रय या वृद्धाश्रमाला आर्थिक मदत करण्यासाठी रवळनाथ प्रतिष्ठान सिधुदुर्गच्यावतीने खानोली रवळनाथ मंदिरात ९ जून रोजी ‘मदनभद्र मंजिरी‘ या संयुक्त दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन केले होते. या नाटाकात सिधुदुर्ग जिल्ह्यातील सुधीर तांडेल, केशव खांबल,विनायक कोनकर, सदाशिव मोडक, वैभव धुरी,जयराम बाणे, प्रल्हाद गांवकर, नारायण आशियेकर,मेघनाथ परब, संतोष सुतार, भाई म्हानकर यांनी भूमिका सादर केल्या. तर हार्मोनियम-पप्पु घाडीगावकर, पखवाज-बाबा मेस्त्री, झांज-चेतन मेस्त्री यांनी संगीतसाथ दिली.
या नाटकाच्या माध्यमातून जमा झालेली मदत स्वरुपातील देणगी खानोली येथील रवळनाथ प्रतिष्ठानने अणाव येथील जीवन सेवा ट्रस्टच्या आनंदाश्रयमधील व्यवस्थापकांकडे सुपूर्द केली. यावेळी रवळनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणपत केरकर, दिपक खानोलकर, सुनिल सावंत, ओंकार खानोलकर, सुनिल घाग, महादेव मेस्त्री, विलास सावंत, अण्णा खानोलकर, वैभव खानोलकर आदी उपस्थित होते.

4