“दाखला आपल्या दारी’ शिबिराला मळेवाड-कोंडूरे येथे प्रतिसाद…

2

सावंतवाडी ता.१७:तालुक्यातील युवा मित्र मंडळ,मळेवाड-कोंडुरेच्या विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी लागणारे दाखले सहज उपलब्ध व्हावे यासाठी “दाखला आपल्या दारी” शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शिबिराला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.तर तयार झालेले दाखले मुलांना घरपोच दिले जाणार आहेत.
यावेळी पालक,मंडळाचे अध्यक्ष हेमंत मराठे,कार्यकर्ते विद्याधर पाटणकर उपस्थित होते.या शिबिराला सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे,मंडळ अधिकारी संजय दळवी,तलाठी रोहन पवार,आकाश मिशाळ यांनीही मोठे सहकार्य केले.

0

4