खास मालवणी भाषेत घेतला समाचार
कणकवली ता 17:
सिंधुदुर्ग जिल्ह्याला बीएसएनएल “फोरजी” सेवेतून वगळल्याचे वृत्त ब्रेकिंग मालवणीने प्रसिद्ध करताच बीएसएनएलसह खासदार विनायक राऊत यांचा आमदार तथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आमदार नितेश राणे यांनी शेलक्या शब्दात समाचार घेतला आहे.
यात जग चालले आहे “फाईव्ह जी”कडे पण सिंधुदुर्ग चाललाय “थ्रीजी” कडे.
निवडून दिलेल्या खासदाराचे काय वजन?असा प्रश्न करून कपाळावर मुकुट आणि खालसुन ना** अशी मालवणी भाषेत बोचरी टीका केली आहे.
याबाबतचे वृत्त ब्रेकिंग मालवणी मधून आज प्रसिद्ध करण्यात आले होते. यात राज्यात मोठ्या प्रमाणात फायदा मिळवून देणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला “फोरजी” सेवेमधून वगळल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. याची श्री राणे यांनी तात्काळ दखल घेतली व खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे.