असरोंडी-ताठरबाव एस.टी. पूर्ववत करा

257
2
Google search engine
Google search engine

बाबा सावंत यांची मागणी : एस.टी.अधिकार्‍यांना निवेदन

कणकवली, ता. १८ : मुंबई गोवा महामार्गावरून जाणार्‍या असरोंडी ताठरबाव या मार्गावरील एस. टी. वाहतूक पूर्ववत करावी अशी मागणी शिवसेना उपतालुकाप्रमुख बाबा सावंत यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी आज एस. टी. अधिकार्‍यांना दिले.
गतवर्षी असरोंडी-ताठरबाव रस्त्यावर खड्डे पडल्याने हा रस्ता वाहतुकीस अयोग्य बनला होता. त्यामुळे गेले वर्षभर या रस्त्यावरून होणारी एस. टी. ची वाहतूक बंद करण्यात आली होती. आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. हा मार्ग वाहतुकीस योग्य असल्याने या मार्गावरील बंद करण्यात आलेली एसटी वाहतूक पूर्ववत करावी अशी मागणी शिवसेना उपतालुकाप्रमुख बाबा सावंत यांनी एसटीचे अधिकारी ल. रा. गोसावी यांच्याकडे केली. त्याबाबतचे लेखी निवेदनही देण्यात आले.
असरोंडी ताठरबाव मार्गावर शाळकरी विद्यार्थी आहेत. तसेच नागरिक देखील मोठ्या संख्येने एस.टी.चा प्रवास करतात. वर्षभर एस. टी.बंद असल्याने इथल्या विद्यार्थ्यांसह नागरिकांना एस.टी.पकडण्यासाठी दोन ते चार किलोमिटरची पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे बंद झालेली एस.टी.वाहतूक तातडीने सुरू करा अशी मागणी श्री.सावंत यांनी केली. तर पुढील काळात या मार्गावरून नियमितपणे एस.टी.बस सोडण्यात येईल अशी ग्वाही एस.टी.अधिकारी श्री.गोसावी यांनी दिली. तसेच त्याबाबतच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
शिवसेना उपतालुकाप्रमुख बाबा सावंत यांच्यासमवेत विभाग प्रमुख दीपक राऊत, असरोंडी शाखा प्रमुख सुनील सावंत, राजू सावंत, विलास साटम, सामाजिक कार्यकर्ते दीपक माने, योगेश परब, बाळा परब, बाळा बागवे, अजय गावडे आदी उपस्थित होते.