सावंतवाडीत मंडळ अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा…पालिका पदाधिकारी आक्रमक; कारवाईची मागणी…

190
2

सावंतवाडी ता.१९:येथील तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी जातीच्या तसेच अन्य दाखल्यांसाठी अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून वेळ काढूपणाची भूमिका घेत आहेत.त्यामुळे याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना सहन करावा लागत आहे.याबाबत त्यांना योग्य त्या सूचना देण्यात याव्या अन्यथा त्यांची बदली करावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे केली.यासंदर्भात आज येथे श्री.साळगावकर यांच्यासह पालिकेच्या नगरसेवकांनी श्री.म्हात्रे यांना घेराव घालत निवेदन दिले .
सध्या विविध दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांना मोठी वणवण करावी लागत आहे.त्यात येथील मंडळ अधिकाऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रा मध्ये वेळोवेळी त्रुटी काढल्या जात आहेत.तर संबंधित प्रशासनाबाबत नागरिकांमधून नाराजी आहे.त्यामुळे सर्व दाखल्यांसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहिती देणारा फलक तहसीलदार कार्यालया बाहेर लावण्यात यावा अशीही मागणी यावेळी त्यांनी केली.
यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर,अनारोजीन लोबो,सुरेंद्र बांदेकर,शुभांगी सुकी,भारती मोरे,राजू बेग,नासिर शेख,सुधीर आडीवरेकर,बाबू कुडतरकर आदी उपस्थित होते.

4