इकोसेन्सिटिव्ह मधून रत्नागिरी सिंधुदुर्गची काही गावे वगळा

2

 

खासदार विनायक राऊत यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

सिंधुदुर्गनगरी ता 19
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील इको-सेन्सिटिव्ह झोनमधून काही गावे वगळण्यात यावी. अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे.
आज त्यांनी याबाबत श्री जावडेकर यांची दिल्ली येथे भेट घेऊन ही मागणी केली. यावेळी इको-सेन्सिटिव्ह मुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात काहीच करता येत नाही त्यामुळे या सर्व मागण्या लक्षात घेऊन याबाबत योग्य तो विचार करण्यात यावा असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.यावेळी प्रमोद कांबळे अभिजीत पारकर महादेव पारकर आदी उपस्थित होते

3

4