नाणार प्रकल्पाची अखेर उचलबांगडी, रायगडमध्ये हलवला…

172
2
Google search engine
Google search engine
Google search engine

जिल्हावासीयांच्या एकीचा विजय:पर्यावरण प्रेमींकडून आनंदोत्सव साजरा…

मुंबई ता.१९: प्रदूषणामुळे बहुचर्चित ठरलेल्या नाणार प्रकल्पाची अखेर उचलबांगडी करणार असल्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्र्यांनी आज अधिवेशनात केली.हा प्रकल्प आता सिंधुदुर्ग रत्नागिरी ऐवजी रायगड येथे उभारला जाणार आहे.या ठिकाणी हा प्रकल्प झाल्यास प्रदूषण मोठ्या प्रमाणात होईल त्यामुळे काही झाले तरी या प्रकल्पाला विरोधच अशी भूमिका शिवसेनेने मांडली होती. 
दोन्ही जिल्ह्यातील लोकांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठे रणकंदन रंगणार होते.मात्र तत्पूर्वी याबाबत सकारात्मक भूमिका घेऊ असा शब्द खुद्द मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी दिला होता.त्यानुसार आता हा प्रकल्प रायगड येथे होणार आहे.
तीन लाख कोटीचा हा प्रकल्प आहे.याठिकाणी प्रकल्प झाल्यास त्याचा बेरोजगारांना फायदा होऊ शकतो. असाही मतप्रवाह भाजपाच्या काहीनी व्यक्त केला होता.परंतु हा प्रकल्प हद्दपार करण्यात यावा अशी मागणी दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांनी केली होती.त्यानुसार हा प्रकल्प आता अन्य ठिकाणी नेण्यात येणार आहे,अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
\