गिरणी कामगारांची २१ जूनला कुडाळमध्ये सभा

2

कणकवली,ता.१९: सर्व श्नमिक संघटनेच्यावतीने गिरणी कामगारांना कायदेशीर हक्काची घरे देऊन पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी शुक्रवार दि. २१ जून रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ येथील रेल्वे स्थानकानजिकच्या सिध्दिविनायक हाँलमध्ये होणार आहे.सभेला संघटनेचे अध्यक्ष काँ. उदय भट, गिरणी कामगार विभागाचे अध्यक्ष काँ. बी.के. आंर्बे, काँ. अनंत मालप हे मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी कामगारांना घरे देण्यासह पेन्शशनमध्ये भरीव वाढ करण्याबाबत शासनाने त्वरीत निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. तरी गिरणी कामगार, वारसांना मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन कोकण संघटक गणपत उर्फ भाई चव्हाण यांनी केले आहे.

1

4