सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी ११.३७ मी.मी. पाऊस…

2

सिंधुदुर्गनगरी ता.१९: जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ११.३७ मिलीमीटर सरासरी पाऊस झाला असून १ जून २०१९ पासून आता पर्यंत १६०.३७ मि.मी. सरासरी एकूण पावसाची नोंद झाली आहे.तालुका निहाय चोवीस तासात झालेला पाऊस पुढील प्रमाणे असून कंसातील आकडेवारी आतापर्यंत झालेल्या एकूण सरासरी पावसाचे आहेत.
सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग ३४ (१९७), सावंतवाडी ०३ (११८), वेंगुर्ला ०१ (१३२), कुडाळ ०९ (१९४), मालवण ०१ (१३३), कणकवली २३ (२०२), देवगड ०३ (१२५), वैभववाडी १७ (१८२) पाऊस झाला आहे.

4