मुंबई – गोवा महामार्गावर मोटारीत स्फोट; चालक ठार

2

खेड, ता.१९ :तालुक्यातील बोरज गावाजवळ मुंबई – गोवा महामार्गावर सकाळी साडे दहाच्या सुमारास धावत्या मोटारीमध्ये स्फोट झाला. स्फोटानंतर मोटारीला आग लागली. आग एवढी भीषण होती की, चालकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला.

मिळालेली माहिती अशी की, मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मोटारीमध्ये मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाजाने बोरज गाव हादरले इतकी त्याची तीव्रता होती. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यत मोटार पूर्णपणे जळून खाक झाली होती. पाण्याच्या टँकरने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला. या घटनेमुळे महामार्गावर मोठी गर्दी झाली होती.

आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर पोलिसांनी रेस्क्यू टीमच्या मदतीने चालकाचा मृतदेह बाहेर काढला. गाडी कोणाची होती, चालक कोण होता, हे अद्याप समजू शकले नाही. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

9

4