आडेली ग्रा.प. गावातील दोन शाळाना काॅम्पूटर प्रदान

2

गावातील अन्य शाळांनाही काॅम्पूटर देणार : कुडाळकर

वेंगुर्ले : ता. १९
तालुक्यातील आडेली ग्रामपंचायत च्या १४ व्या वित्त आयोग निधी मधून पूर्ण प्राथमिक शाळा खुटवळ व पूर्ण प्राथमिक शाळा जांभरमळा या दोन्ही शाळांना काॅम्पूटर उपलब्ध करून भेट देण्यात आले.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी या दोन्ही शाळांना संगणक उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थी, शिक्षक व पालकां मधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आधुनिक डिजिटल शिक्षण युगात शालेय जिवनात मुलांना संगणक ज्ञानाची खरी गरज लक्षात घेऊन संगणक उपलब्ध केल्याचे आडेली सरपंच सौ. समिधा कुडाळकर यांनी सांगितले. तसेच गावातील इतर शाळांनाही येत्या काही महिन्यात टप्पा – टप्प्याने संगणक दिले जातील, असे सरपंच सौ कुडाळकर यांनी सांगितले . यावेळी प्राथमिक शाळा खुटवळ येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री हेमंत पेडणेकर, सोसायटी चेअरमन समीर कुडाळकर, शाळेचे शिक्षक , पालक तसेच जांभरमळा शाळेचे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री मदन धुरी , शाळेचे शिक्षक , पालक उपस्थित होते.

4