जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत तुळसचा तुषार परब प्रथम…

2

वेंगुर्ले ता. १९; आेरोस येथील जलतरण तलावात घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ५० मी.फ्री स्टाईल जलतरण स्पर्धा प्रकारात तुळस काजरमळी येथील जलतरणपटू तुषार परब याने प्रथम क्रमांक मिळवत आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ सदरची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.आेरोस येथे भाई सावंत यांच्या हस्ते तुषार याला प्रथम क्रमांकाचे गोल्ड मेडल देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, पं.स.सदस्य गोपाळ हरमलकर, शेखर सामंत, उदय जांभवडेकर, शुभम राठिवडेकर, कल्पना तेंडुलकर, जलतरण तलावाचे प्रशिक्षक प्रवीण सुलोकर, प्रकाश वराडकर, दिपक सावंत, उल्हास पालव तसेच सामाजिक व राजकीय लोक उपस्थित होते.
तुषारने यापूर्वीही ठिकठिकाणी झालेल्या जलतरण स्पर्धेत विशेष कामगिरी बजावली आहे.तसेच वेताळ प्रतिष्ठान तुळसच्या माध्यमातून अनेकवेळा रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत अनेकांचे प्राण वाचवले आहेत.त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

4

4