दाभोली-वेतोरे रस्ता केसरकरांच्या प्रयत्नातून…

2

आबा कोंडस्कर; राजन तेलींनी फुकाचे श्रेय घेऊ नये…

वेंगुर्ले ता.१९: तालुक्यातील दाभोली-वेतोरे रस्ता हा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे.त्यामुळे राजन तेली यांनी खोटी माहिती सांगून जनतेची दिशाभूल करू नये अशी टीका शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आबा कोंडस्कर यांनी केली.
या रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.त्यामुळे तेलींच्या आंदोलनाची गरज नाही.असेही त्यांनी म्हटले आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उघड टीका केली आहे.यात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की दाभोली वेतोरे रस्ता पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून झाला असून या रस्त्याला बजेट मधून ३.२५ कोटी रुपये मंजूर आहेत. या रस्त्याची निविदा होऊन कार्यारंभ आदेशही झाला आहे. रस्ता डांबरीकरणाची कामे २० मे नंतर करण्यास बंदी आहे याचे पूर्ण ज्ञान राजन तेलीना आहे.मात्र केवळ नागरिकांना भडकवण्यासाठी व राजकीय फायद्यासाठी तेली रास्तारोको कारण्याची भाषा करत आहेत.
या रस्त्याबाबत पालकमंत्री केसरकर यांनी संबंधित विभाग व ठेकेदार याना योग्य सूचना दिल्या आहेत. श्री तेली विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी अशाप्रकारे वेगवेगळ्या युक्त्या करीत असून त्यांची भूमिका पूर्णपणे चुकीची आहे. या रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे त्यामुळे तेली यांच्या आशा कोणत्याही आंदोलनाची गरज नाही. हा रस्ता बजेट मधून मंजूर आहे याची तेली यांना पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे तेली यांनी फुकाचे श्रेय घेऊ नये अशी जोरदार टीका आबा कोंडस्कर यांनी राजन तेली यांच्यावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

0

4