Saturday, January 18, 2025
Google search engine
HomeUncategorizedदोडामार्ग वासियांचे सक्शन मशीनसाठी अनोखे आंदोलन

दोडामार्ग वासियांचे सक्शन मशीनसाठी अनोखे आंदोलन

मागणी पूर्ण करण्यास अपयशी ठरलेल्या मुख्याधिकाऱ्यांच्या सत्काराचा प्रयत्न

दोडामार्ग ता.१९: येथील नागरिकांना सक्शन मशीन सेवा देण्यास अपयशी ठरलेल्या मुख्याधिकारी राहुल इंगळे यांचा सत्कार करून अनोखे आंदोलन करण्याचा प्रयत्न आज तेथील माजी नगराध्यक्ष संतोष नानचे,नगरसेवक व महाराष्ट्र स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी केला.परंतु येत्या दहा दिवसात तांत्रिक अडचणी दूर करून आपण सेवा पुरवू असे आश्वासन श्री.इंगळे यांनी दिल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी माघार घेतली.यावेळी अशा पद्धतीने माझा सत्कार न करता नगरवासियांना सेवा देताना सत्कार करा,असे श्री.इंगळे यांनी सांगितले.
हे अनोखे आंदोलन आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने करण्यात आले.यावेळी नगरसेवक आदिती मणेरीकर ,विनया म्हावळणकर ,हर्षदा खरवत , स्वाभिमान शहराध्यक्ष दादा बोर्डेकर , कार्यकर्ते प्रकाश काळबेकर , सुरेंद्र रेडकर , संदीप कोरगावकर , महिला तालुकाध्यक्ष सविता कासार , आदींनी नगरपंचायतीला धडक दिली.मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना धारेवर धरत पाच महिने लोटूनही दिलेले लेखी आश्वासन पूर्ण न केल्याने प्रशासनाच्या व्यवस्थेवर बोट ठेवत मुख्याधिकारी यांना जाब विचारला.
यावेळी सत्कारासाठी आणलेले शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ त्यांच्या टेबलावर ठेवले.परंतु श्री इंगळे यांनी स्विकारण्यास मनाई केली.तांत्रिक दृष्ट्या अहवाल पाहून त्यावर उपाययोजना करून येत्या दहा दिवसात लोकांच्या सेवेसाठी सक्शन व्हॅन उपलब्ध करून देऊ असे सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments