सडुरे शिराळे ग्रा.पं.सदस्य नवलराज काळे यांचे उपोषण अखेर मागे

2

वैभववाडी ता.१९: प्रलंबित विकास कामांच्या पूर्ततेसाठी सडुरे शिराळे ग्रा. पं. सदस्य नवलराज काळे यांनी तहसिल कार्यालयासमोर बुधवारी सकाळी ११. वाजल्यापासून उपोषणास बसले होते. अखेर सायंकाळी उशिरा जि. प. बांधकामचे उपअभियंता श्री. आर. पी.  सुतार उपोषणस्थळी दाखल होत गणेश चतुर्थीपूर्वी रस्त्यावरील खड्डे भरून दुतर्फा झाडी मारून देतो. असे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रा. पं.  सदस्य नवलराज काळे यांनी उपोषण मागे घेतले.
सडुरे चव्हाणवाडी व शिराळे पावणाई येथील साकवाची दुरुस्ती करणे, शिराळे शाळा ते गांगो मंदिर रस्ता दुरुस्ती करणे, विजेचा धोकादायक खांब तात्काळ बदलणे तसेच १४ व्या वित्त आयोगातील अपूर्ण विकास कामे मार्गी लावावीत. या मागण्यांसाठी काळे यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण बुधवारी सकाळी तहसिल कार्यालयासमोर केले. अखेर सायंकाळी ६. वाजण्याच्या सुमारास जि. प. बांधकामचे उपअभियंता श्री. आर. पी. सुतार उपोषण स्थळी दाखल होत शिराळे गांगो मंदिर ते शाळा, रस्ता दुरूस्ती गणेशचतुर्थीपूर्वी खड्डे बुजवून दुतर्फा झाडी मारण्यात येईल. तसेच जिर्ण धोकादायक पोल बदलून देतो. असे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रा. पं. सदस्य नवलराज काळे यांनी सायंकाळी उशिरा उपोषण मागे घेतले. या उपोषणामध्ये उपसरपंच संतोष पाटील, विठ्ठल शेळके, घाटू कोकरे, गंगूबाई शेळके, कोंडाबाई शेळके, प्रेमा शेळके आदी सहभागी झाले होते. उपोषणस्थळी स्वाभिमान अध्यक्ष अरविंद रावराणे, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

8

4