Thursday, December 12, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजन तेलींकडून छत्र्यांचे वाटप

मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजन तेलींकडून छत्र्यांचे वाटप

सावंतवाडी, ता. २०: विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास आता सुरुवात झाली आहे.जो तो उमेदवार मतदारांपर्यंत पोचण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविणार आहे.अशा परिस्थितीत भाजपा मधून सावंतवाडी विधानसभा लढवण्यास इच्छुक असलेल्या आमदार राजन तेली यांनी मतदारांपर्यंत आपली निशाणी पोचविण्यासाठी छत्र्या वाटपाचा कार्यक्रम सुरू केला आहे. विशेष म्हणजे बाजारपेठेत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांपासून सर्वसामान्य नागरिकांना या छत्र्या वाटप करण्यात येणार आहे.काल सावंतवाडी येथे छत्र्यांचे वाटप करण्यात आल्यानंतर आता वेंगुर्ला व दोडामार्गमध्ये वाटप करण्यात येणार आहे.श्री तेली हे भाजपामधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. अदयाप पर्यंत युती होणार की नाही याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. तरीसुद्धा आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून श्री तेली यांच्याकडून आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आतापासूनच मतदारांना आपल्या चिन्हांची ओळख पटावी तसेच आपल्या एखाद्या उपक्रमाचा लोकांना फायदा व्हावा या उद्देशाने त्यांनी ही वेगळी अनोखी शक्कल काढल्याची चर्चा सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments