दोडमार्गात एसटी बस चरात कलंडली

410
2

दोडामार्ग,ता.२०: समोरुन येणाऱ्या गाडीला बाजू देत असताना आज बेळगाव चंदगड दोडामार्ग या एसटी बसला अपघात झाला.गाडी जिओ केबलसाठी खोदलेल्या चरात कलंडली.मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. ही घटना आज सकाळी ९:४५ वाजता घडली. यात गाडीतून सुमारे ३८ प्रवासी प्रवास करत होते. जिओ कंपनी कडून मोबाईलची केबल टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या चरात ही एसटी बस कलंडली सुदैवाने यात कोणी जखमी झाले नसले तरी बांधकाम आणि कंपनीच्या वेळ काढू भूमिकेबाबत ग्रामस्थांतुन नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

4