वेंगुर्ले : ता. २० ,शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित प्रिं. एम आर देसाई इंग्लिश मिडीयम स्कुल वेंगुर्ला चा विद्यार्थी कु चिन्मय नारायण पेडणेकर याने इयत्ता ५ वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इंग्रजी माध्यमातून ३०० पैकी २२६ गुण मिळवून शहरी विभागात जिल्ह्यात १७ वा तर तालुक्यात २रा येण्याचा मान पटकाविला आहे.प्रशालेतून १० पैकी ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांना मुख्याध्यापक मिताली होडावडेकर, शिक्षिका संजया परब, नोवेना वशाळकर, धनश्री तुळसकर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याचे शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर चे सचिव जयकुमार देसाई, पेट्रॉन काँसिल मेंबर दौलतराव देसाई, स्थानिक सल्लागार समिती सदस्य प्रा. आंनद बांदेकर, सुरेंद्र चव्हाण केंद्रप्रमुख प्रभुखानोलकर यांनी अभिनंदन केले. कु चिन्मय याच्या या यशाबद्दल त्याचे शिक्षक पालक व सर्व स्तरातून कौतुक होत आहे.