आ. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कणकवलीत दाखला मित्र अभियान सुरू

2

लाभार्थ्यांसाठी मिळणार दाखल्यांसाठी मोफत अर्ज; जि़ प़ अध्यक्षांच्या हस्ते कक्षाचा शुभारंभ

कणकवली, ता.20 : आ़ नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कणकवली तहसिल कार्यालय येथे विद्यार्थी आणि गरजूंसाठी ‘दाखला मित्र अभियान’ सुरू करण्यात आले आहे़ या ठिकाणी दाखल्यांसाठी आवश्यक असलेले अर्ज लाभार्थ्यांना मोफत दिले जाणार आहेत़ दाखला मिळवून देण्यासाठी स्वाभिमान पक्षाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य विद्यार्थ्यांनी आणि लाभार्थ्यांना केले जाणार आहे़ या अभियानासाठी उभारण्यात आलेल्या कक्षाचे फित कापून ़जि़ प़ अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला़ या अभियानामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या दाखल्यांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी तसेच वेगवेगळ्या योजनांसाठी गरजूंना अवश्यक असलेले दाखले मिळण्याच्या समस्या सुटतील़ स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते हे दाखले मिळवळून देण्यासाठी जनतेला सहकार्य करतील़ म्हणूनच या अभियानासाठी हा कक्ष आ़ नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केला असल्याचे प्रतिपादन जि़ प़ अध्यक्षा सौ़ संजना सावंत यांनी केले़
कणकवली तहसिल कार्यालय येथे दाखल मित्र अभियानाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या़ यावेळी जि़ प़ माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, स्वाभिमान युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे, शहराध्यक्ष राकेश राणे, सभापती सुजाता हळदिवे-राणे, उपसभापती सुचिता दळवी, उननगराध्यक्ष बाबू गायकवाड, महिला तालुकाध्यक्षा स्वाती राणे, शहराध्यक्षा संजिवनी पवार, नगरसेवक मेघा गांगण, प्रकाश सावंत, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विठ्ठल देसाई, पं़ स़ सदस्य मिलींद्र मेस्त्री, माजी नगरसेवक अण्णा कोदे, सुभाष मालंडकर, संजय नकाशे, अक्षय राणे, स्वप्नील चिंदरकर, किशोर राणे, युवक तालुकाध्यक्ष सचिन पारधिये, हेमंत वारंग, महेंद्र डिचोलकर, शहर उपाध्यक्ष नितीन पाडावे, गणेश तळगांवकर, शहर युवक अध्यक्ष औंदुबर राणे, सोहेल खान, शिवसुंदर देसाई, रूजाय फर्नांडीस आदी स्वाभिमान पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़
यावेळी विद्यार्थ्यांना दाखल्यांचे अर्ज वितरीत करण्यात आले़ उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, वयअधिवास दाखल, राष्ट्रीयत्व दाखला, नॉन क्रिमिलेअर दाखल, डोंगरी दाखले मिळवण्यासाठी कागदपत्रांची पुर्तता लाभार्थ्यांना करून देण्याच्या कामी स्वाभिमान पक्ष मदत करेल़ त्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आल्याची माहिती स्वाभिमान युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी दिली़

6

4