सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
सहकारी संस्था म्हणून नोंदणी नसल्याने जिल्ह्यातील ४ संस्थांच्या सभासद शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळालेला नाही. हे शेतकरी त्यापासून वंचित राहिले आहेत. शासनाच्या योजनेचा या संस्थांमधील शेतकऱ्यांना लाभ मिळत नसल्याने या संस्थांमधुन कृषी कर्ज घेण्यास शेतकरी टाळाटाळ करीत आहेत. परिणामी शेतकरी शेतीपिक घेणार नाहीत. त्यामुळे आपल्या संस्थांचा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत समावेश करुन कृषी कर्ज वितरित करण्यास शासनाकडून मान्यता दयावी तसेच कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेले संस्थेच्या सभासदांना कर्जमाफी योजनेचा लाभ ३० जून पर्यंत मिळवून दयावा अन्यथा २ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह धरणे आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा पिक कर्जवाटपापासून वंचित राहिलेल्या संस्थांच्या समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा उपनिबंधक डॉ मेधा वाके यांना सादर करण्यात आले. यावेळी जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, प्रकाश मोर्ये तसेच व्ही व्ही तानावडे, दिव्या पेडणेकर, आर आर निगम, आर आर धाऊसकर यांच्यासह संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
वालावल विभाग कृषी उद्योग सहकारी संघ मर्या. कुडाळ, सहकारी महादेवाचे केरवडे ग्रामस्वराज्य सोसा. लि. केरवडे, श्री देवी सातेरी महिला विकास सेवा सोसा. लि. निरवडे आणि माऊली महिला बहुउद्देशीय औद्योगिक सहकारी संस्था न्हावेली या संस्था गेली अनेक वर्षे आपल्या कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांना शेती व शेतीपूरक कर्ज पुरवठा करीत आहेत. मात्र या संस्थांची नोंदणी विकास संस्था म्हणून नसल्याने शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ च्या कर्जमाफी मधून वगळण्यात आले. त्यामुळे या संस्थांमधुन कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेपासून वंचित रहावे लागले आहे. त्याचा परिणाम संस्थेच्या कर्ज वसुलीवर होवून थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संस्था आर्थिक अडचणीत आल्या आहेत. याबाबत जिल्हा बँकेकडून शासनस्तरावर पाठपुरवा सुरु आहे. मात्र शासनाकडून त्याला अद्याप प्रतीसाद मिळालेला नाही.
पुन्हा नव्याने जिल्हा बँकेकडे कर्ज मागणी केल्यास त्याला मंजूरी मिळेल परंतू शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार नाही. परिणामी शेतकरी शेतीपिक घेणार नाहीत. त्यामुळे आपल्या संस्थांचा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत समावेश करुन कृषी कर्ज वितरित करण्यास शासनाकडून मान्यता दयावी. तसेच कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेले संस्थेच्या सभासदांना कर्जमाफी योजनेचा लाभ ३० जून पर्यंत मिळवून दयावा अन्यथा २ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह धरणे आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा पिक कर्जवाटपापासून वंचित राहिलेल्या संस्थांच्या कमिटिने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
शेतकरी सन्मान योजनेचा नोंदीत असलेला संस्थांना लाभ मिळवा,अन्यथा २ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES