एस.टी भरती प्रक्रियेत अन्याय झालेल्या उमेदवारांना सामावून घेण्याचे आदेश

140
2
Google search engine
Google search engine
Google search engine

जिल्ह्यासह अन्य ठिकाणच्या ९४५ उमेदवारांना मिळणार लाभ…

मुंबई ता.२०: एस.टी.महामंडळाच्या भरती प्रक्रियेत तांत्रिक त्रुटींमुळे अन्याय झालेल्या उमेदवारांना अखेर सामावून घेण्याचे आदेश महामंडळाचे व्यवस्थापक माधव काळे यांनी काढले आहेत.याबाबतचे आदेश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले होते.त्यामुळे याचा लाभ जिल्ह्यासह अन्य ठिकाणच्या ९४५ उमेदवारांना होणार आहे.
हा प्रश्न सुटावा त्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर,खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक व एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष संजय पडते त्यांनी प्रयत्न केले होते.प्रश्न सुटल्यानंतर श्री.पडते यांनी मुंबई येथे जाऊन पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.या भरती प्रक्रियेत रत्नागिरी,सिंधुदुर्ग,ठाणे,मुंबई पालघर व रायगड आदी ठिकाणचे ९४५ उमेदवार होते.

\