पिंगुळी येथील धुरी कुटूंबासाठी मराठा समाजाचा ‘अचानक’ मूक मोर्चा

268
2
Google search engine
Google search engine

धुरी कुटुंबियांवर खोटी तक्रार : पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
पिंगूळी येथील धुरी कुटुंबा विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात खोटी फिर्याद दिल्याच्या रागातून जिल्ह्यातील मराठा समाजाचे गुरुवारी ‘अचानक’ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मूक मोर्चा काढला. सिंधुदुर्गनगरी येथील सिडको कार्यालयाकडून हा मोर्चा निघाला. अचानक काढलेल्या या मोर्चात १०० च्या वर मराठा बांधव सहभागी होते. जिल्हा पोलीस दलातील गृह विभागाच्या उपअधीक्षक संध्या गावडे यांनी स्विकारले.
यावेळी जिल्हा सकल मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक अँँड सुहास सावंत, बाबा आंगणे, संध्या तेरर्से, बंड्या सावंत, सुंदर सावंत, धीरज परब, रेवती राणे, उल्का धुरी, राजेंद्र राणे आदींसह कुडाळ येथील असंख्य मराठा बांधव उपस्थित होते.
या निवेदनात ‘१८ जून २०१९ रोजी धुरी यांच्या घरात पाहुणा म्हणून आलेल्या मुलाचा व फिर्यादी पिंगूळकर यांच्यामध्ये गाड्या एकमेकांना लागल्यावरून वाद झाला होता. त्या वादावर पडदा पडला होता. मात्र, यातील फिर्यादी हे धुरी यांच्या घरात घुसत पाहुणा मुलगा व त्याच्या मामीला मारहाण करू लागला. फिर्यादीने घरातील महिलांशी गैरवर्तन केले. महिलेचा विनयभंग केला. मात्र, या विरोधात आपल्यावर गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी स्वतःलाच जातीवाचक शिवीगाळ केल्याची खोटी तक्रार धुरी यांच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात दिली.’


त्यामुळे धुरी यांच्या घरातील ११ सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा सामाजिक सलोखा जपणारा जिल्हा आहे. या जिल्ह्याला जातीय दंगलीची पाश्वभूमी नाही. आरक्षणासाठी मराठा समाजाने काढलेल्या भव्य मूक मोर्चात सर्व समाज-जातीच्या व्यक्तींनी पाठिंबा दिला होता. मात्र, धुरी यांच्या विरोधात देण्यात आलेली खोटी तक्रार हा जातीय सलोखा बिघडविणारा आहे. जिल्ह्याला लाजविणारी हि घटना आहे. या प्रकरणी योग्य चौकशी करून धुरी कुटुंबियांवरील खोटी जातीवाचक कलमे मागे घ्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.