रत्नागिरी, ता.20 : जगातील सर्वात मोठ्या लांबीच्या करबुडे बोगद्यात कोचिवल्ली एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. ती गाडी पाऊण तास टनेलमध्येच अडकून पडली होती.
प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी अलर्ट झालेल्या प्रशासनाने तत्काळ दुसरे इंजिन मागवून कोचिवल्ली एक्सप्रेस संगमेश्वरला नेण्यात अली. प्रवाशांना आरोग्याचा त्रास होऊ नये म्हणून कोकण रेल प्रशासनाने तत्काळ आरोग्य यंत्रणा हजर झाली होती. 5 प्रवाशांना दम्याचा त्रास जाणवला, त्यांना उपचार करून सोडण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र या प्रकारामुळे वाहतूक सुमारे 1 तास खोळंबलेली होती.
दरम्यान, गाडीत कुणीतरी स्मोकिंग केल्याने हा गोंधळ झाला असावा असा अंदाज रेल प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे।