शिवसेनेच्यावतीने २३ जूनला गुणवंतांचा सत्कार…

2

आम. वैभव नाईक यांची माहिती…

मालवण, ता. २० : शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून आणि मालवण तालुका शिवसेनेच्यावतीने तालुक्यातील विविध शाळा, कॉलेजमध्ये दहावी, बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ २३ जून रोजी सकाळी १० वाजता दैवज्ञ भवन येथे आमदार नाईक यांच्या उपस्थितीत होणार आहे.
दहावी, बारावी परीक्षेत उज्ज्वल यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारावी. त्यांचा गुणगौरव करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा द्याव्यात जेणेकरून विद्यार्थी यातून प्रेरणा घेत आपले आयुष्य उज्ज्वल करतील या हेतूने हा कार्यक्रम घेतला जात असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले.
या कार्यक्रमास माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नितीन वाळके, बाबी जोगी, मंदार गावडे, बाबा आंगणे, बाबा सावंत, भाऊ परब आदी उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थी, पालक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. नाईक यांनी केले आहे.

4