शेतकऱ्याची फसवणूक; कृषी विभागाची कारवाई…
वेंगुर्ले ता. २०:तालुक्यातील टाकेवाडी-मठ येथील शेतकरी मंगेश महादेव नाबर यांना खासगी कंपनीतील विक्रेत्यांनी बेकायदेशीर व बोगस सेंद्रिय खत पुरविले आहे.जिल्हा गुणवत्ता नियंत्रण विभागाला या बाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाड टाकून पाहणी केली असता,त्यांना १ लाख ९२ हजार रुपये किमतीचे खत आढळून आले.त्यांनी हा साठा जप्त करून वेंगुर्ले पोलीस ठाण्यात तक्रात दाखल केली आहे.
नाबर या शेतकऱ्याला कोल्हापूर येथील सेंद्रिय खत कंपितर्फे निवृत्ती सोनवणे रा.उस्मानाबाद आणि राजू मकानदार रा.कोल्हापूर या वितरकानी आपल्याकडे चांगले खत असल्याचे सांगून त्यांना सेंद्रिय खताच्या ४० किलोच्या १७३ बॅग आणि हुमिक एसिड च्या ५ लिटरचे २० कॅंन व १ लिटरच्या ३५ बाटल्या विकत दिल्या.याची किंमत १ लाख ९२ हजार ८४ रुपये आहे.कोल्हापूरची ही कंपनी कृषी आधार,कृषी वर्धन, जिवामृत या नावाने ही खते व कीटकनाशके विकतात.परंतु या खतांमध्ये पाहीजेत्या प्रमाणात शेतीला योग्य घटक नसतात.
या बाबत जिल्हा गुणवत्ता नियंत्रण विभागाला माहिती मिळताच त्यांचे निरीक्षक पी.बी.ओहोळ,तालुका कृषी अधिकारी आर.डी.कांबळे, कृषी अधिकारी एस.एस.कुलकर्णी,प्रभारी मंडळ कृषी अधिकारी एम. बी. मराठे यांच्या पथकाने मठ येथे धाड टाकून नाबर यांच्या शेत मंगरात ठेवलेल्या खताची पाहणी केली असता ते बोगस खत असल्याचे आढळून आले.त्यामुळे याची तक्रार पोलिसात करून हे खत जप्त करण्यात आले.