शिष्यवृत्ती परीक्षेत दोडामार्ग हायस्कूलचे घवघवीत यश

2

पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कृष्णराव गवस तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात सहावा

दोडामार्ग, ता.२०:महाराष्ट्र राज्य शैक्षणिक परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत दोडामार्ग हायस्कूलने घवघवीत यश संपादन केले आहे.पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कृष्णराव बाबुलनाथ गवस तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात सहावा,भूषण सुनिल गवस जिल्ह्यात १९ वा,आर्यन उत्तम पास्ते तालुक्यात ८ वा आला. तसेच पुर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आर्यन जालिंदर शेंडगे जिल्ह्यात ७१ वा, प्रथमेश विजय पाटील जिल्ह्यात ६० व्या क्रमांकाने गुणवत्ता यादीत आले.
सर्व विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री. विकासभाई सावंत, सचिव सोनू सावंत , सर्व संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यांच्यामार्फत अभिनंदन करण्यात आले.

12

4