दुर्लक्षित सुगंधी व वनौषधी वनस्पतींचा अभ्यास करणे काळाची गरज

2

कुलगुरु डॉ. संजय सावंत यांचे प्रतिपादन :आसोली येथे औषधी व सुगंधी रोपांचे वितरण

वेंगुर्ला, ता.२०: कोकणातील आंबा, काजू इत्यादी पारंपारीक पिकांबरोबरच बदलत्या हवामानात तग धरु शकणा-या या दुर्लक्षित सुगंधी व वनौषधी वनस्पतींचा अभ्यास करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कुलगुरु डॉ. संजय सावंत यांनी आसोली येथे केले. औषधी व सुगंधी वनस्पती यांचे संवर्धन आणि विस्तार होण्यासाठी डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला व लुपिन ह्युमन वेलफेअर अॅण्ड रिसर्च फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ग्रामिण जीवनोत्ती अभियान यांच्या सहकार्याने वेंगुर्ला तालुक्यातील आसोली येथे १७ जून रोजी दुर्लक्षित सुगंधी व वनौषधी वनस्पती संवर्धनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरु डॉ. संजय सावंत, वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ.बी.एन.सावंत, डॉ. पराग सावंत,लुपिनचे संचालक योगेश प्रभू, पंचायत समिती सभापती सुनिल मोरजकर, आसोली सरपंच रिया कुडव, माजी सरपंच सुजाता देसाई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

6

4