वेंगुर्लेत योगदिन साजरा : नागरिकांचा सहभाग

247
2

वेंगुर्ले,ता. २१ :जागतिक योगदिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला नगरपरिषद, वेंगुर्ला तालुका क्रीडा केंद्र व डॉ. वसूधाज् योगा अॅण्ड फिटनेस अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आज येथील साई मंगल कार्यालयात योगासनांचे विविध प्रकार करुन ‘योगा दिन’ साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांच्या हस्ते झाले. प्रारंभी माजी नगरसेविका अन्नपूर्णा नार्वेकर यांनी ‘तु शक्ती दे, तु बुद्धी दे‘ हे गीत सादर केले. यावेळी डॉ. वसूधाज् योगा अॅण्ड फिटनेस अॅकॅडमीच्या योग प्रशिक्षक उर्वी गावडे,मीरा सावंत, दादा साळगांवकर, अदिती मांजरेकर, वृंदा मोर्डेकर, शुभांगी कनयाळकर तसेच वेंगुर्ला तालुका क्रीडा केंद्राचे जयवंत चुडनाईक यांनी उपस्थितांना योगाचे प्रशिक्षण दिले. डॉ. वसूधाज् योगा फिटनेसच्या कु. मारीया आल्मेडा हिने नृत्यातून योगप्रकार सादर करीत उपस्थितांकडून वाहवा मिळविली. कार्यक्रमाला नायब तहसिलदार नागेश शिदे,नगरसेवक राजेश कांबळी, स्नेहल खोबरेकर,नगरपरिषद लिपिक संगीता कुबल, प्रथमेश बिजितकर, लायनेस क्लबच्या प्राची मणचेकर,पाटकर हायस्कूलचे शिक्षक एस.जे.पेडणेकर, एम.एम.खरात, एस.के.रेड्डी यांच्यासह नगरपरिषद कर्मचारी, बहुसंख्य नागरीक तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

4