सावंतवाडी, ता.२१:येथील राष्ट्रवादीच्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या निरीक्षकपदी सौ अर्चना संदीप घारे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र खुद्द राष्ट्रवादी पक्षाचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि व अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते घारे यांना प्रदान करण्यात आले.
सौ. घारे या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी आगामी काळात उमेदवार म्हणून चर्चिल्या जात आहेत त्यांच्या या निवडीमुळे या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाला हक्काचा पदाधिकारी मिळणार आहे.त्यांनी आपल्या माध्यमातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच रिक्त असलेली महत्त्वाची पदे येत्या दहा दिवसात भरावीत असे या पत्रात म्हटले आहे .सौ घारे सावंतवाडी शहराच्या सुपुत्री आहेत गेल्या काही महिन्यात त्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आरोग्य शिबीर पुस्तक प्रदर्षण सर्व सामान्य कार्यकर्त्यासाठी सहकार्य असे विविध उपक्रम लाभ राबवले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पक्षाकडून त्यांचा गौरव करण्यात आला.
राष्ट्रवादीच्या सावंतवाडी विधानसभा निरिक्षकपदी अर्चना घारेंची निवड…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES