मनसेकडून सत्कार :मित्रांच्या सत्कारासाठी जुना मित्र धावला
सावंतवाडी ता 21: येथील पालिकेत काम असताना प्रामाणिकपणे काम करून सावंतवाडी पालिकेला कर्जमुक्त करण्याबरोबर एका चांगल्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा सत्कार मनसेच्या वतीने आज माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला.
यावेळी श्री साळगावकर यांनी गेल्या काही वर्षात केलेले काम हे सर्वसामान्य नागरिकांना फायद्याचे ठरले तसेच कर्ज मुक्त पालिका करून राज्याला साळगावकर यांनी आदर्श घालून दिला, खराब झालेले रस्ते पुन्हा ठेकेदाराला करायला सांगून देशात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे असा विश्वास श्री उपरकर यांनी यावेळी व्यक्त केला.
श्री साळगावकर हे प्रामाणिक आहेत ते माझे जुने मित्र आहेत त्यामुळे त्यांच्या पाठीशी आम्ही कायम आहोत त्यामुळे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे आमचे कर्तव्य आहे असे उपरकर यांनी सांगितले
आभार मानणाऱ्या मनसैनिकांची श्री साळगावकर यांनी आभार मानले.यावेळी अँड राजू कासकर, जिल्हाकार्याध्यक्ष संतोष भैरवकर, तालुकासचिव विठ्ठल गावडे, म.न.वि.से शहराध्यक्ष आशिष सुभेदार, म.न.वि.से उपशहरअध्यक्ष विनोद पोकळे ,महेश बांदिवडेकर, संकेत मयेकर, संकेत शेटकर, गणेश नाईक, सागर कदम,ओंकार कुडतरकर आदी उपस्थित होते.