Tuesday, February 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याजिल्ह्यातील ९० पूर्वीचे शिवसैनिक येणार एकत्र

जिल्ह्यातील ९० पूर्वीचे शिवसैनिक येणार एकत्र

गेट-टुगेदरचे आरोजन: परशुराम उपरकर यांची संकल्पना

सावंतवाडी, ता.२१: जिल्ह्यातील शिवसेनेला तत्कालीन परिस्थितीत बळकटी देणाऱ्या जुन्या आणि ९० पूर्वीच्या शिवसैनिकांचा सत्कार करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. त्यासाठी जुन्या शिवसैनिकांना घेऊन लवकरच गेट-टुगेदर करण्यात येणार आहे. अशी माहिती मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे दिली.मनसेच्यावतीने आज नगराध्यक्ष साळगावकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री उपरकर बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर,नगरसेवक आनंद नेवगी उपस्थित होते.
यावेळी उपरकर म्हणाले आम्ही ९० पूर्वी सर्वजण शिवसेनेत होतो. त्यावेळी एकत्र येऊन राजकारण सुरू केले. तत्कालीन परिस्थिती अत्यंत खडतर.अशा परिस्थितीत सुध्दा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केला. आज आम्ही सर्वजण वेगळ्या पक्षात आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा या सर्व जुन्या शिवसैनिकांना एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा आमचा मानस आहे. यासाठी नुकतीच जुन्या शिवसैनिकांची बैठक घेण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व व जुन्या शिवसैनिकांना हा प्रस्ताव मान्य करत गेट-टुगेदर करण्याचे मान्य केले. त्यानुसार येत्या महिन्यात आम्ही पुन्हा एकदा एकत्र येणार आहोत त्यात तत्कालीन सर्व शिवसैनिकांना आमंत्रण देण्यात येणार आहे त्यात आता अन्य पक्षात असलेल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश असणार आहे. तसेच जे आता राहिले नाहीत त्यांची आठवण करण्यात येणार आहे. पक्षभेद विसरून सर्वांनी एकत्र यावे मागचा इतिहास पुन्हा उजळावा यासाठी हा प्रयत्न सुरू आहेत.
उपरकर पुढे म्हणाले त्यावेळची परिस्थिती अत्यंत खडतर होते जुने शिवसैनिक केवळ बाळासाहेबांच्या आदेशासाठी काहीही करण्यास तयार होते. त्यावेळी गाड्या नव्हत्या वडापाव खाऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात असत मिळण्यासाठी सर्वजण ट्रक च्या माध्यमातून अमरावती येथे गेलो होतो. अशा अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला यावेळी बबन साळगावकर यांनी आपल्याकडे असलेला शिवसेनेतील आठवणींचा अल्बम उपरकर यांना दाखवला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments