बेडफोर्डपासून शिवशाहीपर्यंतचा इतिहास सांगत लालपरीची वारी आज कणकवलीत उद्या मालवणात

253
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.२१ : १९४८ ची बेडफोर्ड पासून सुरु झालेला लालपरीचा इतिहास ग्रामीण जनजीवनाशी जोडला गेलाय. ग्रामीण भागाशी असलेल्या अतूट नात्यामुळेच. एसटीच्या ७१ वर्षाचा इतिहास वारी लालपरीची या फिरत्या प्रदर्शनातून महाराष्ट्राला पुन्हा अनुभवायला मिळत आहे. वारी लालपरीची आज कणकवलीत दाखल झाली. आज संपूर्ण दिवस हे प्रदर्शन कणकवली बसस्थानकात नागरिकांना पाहायला उपलब्ध झाले आहे. तर उद्या (ता.२२) मालवण येथे हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.


पहिल्यावहिल्या बेडफोर्ड नंतर मॉरिस कर्मेशियल, अलबियन,टाटा मर्सडीज़ बेन्ज, से लॅण्ड टायगर, एसी कोच, लक्झरी कोच,सिल्पर कोच, एशियाड, सुपर डिलक्स, शिवनेरी, परिवर्तन बस, शिवशाही, विठाई बसपर्यंतचा इतिहास सांगत ही लालपरीची वारी रत्नागिरीतून आज कणकवलीत दाखल झाली आहे.
कणकवली बसस्थानकात लालपरीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी एसटीचे अधिकारी एल. आर. गोसावी, कणकवली एसटी व्यवस्थापक प्रमोद यादव, आगार प्रमुख निलेश लाड, अभियंता अजित मागेलकर, संग्राम शिंदे, पी. एस. गोसावी, संजय प्रभू , बी. के. माने आदी मान्यवर उपस्थित होते. फिरत्या बसमध्ये आतापर्यंतच्या बसच्या प्रतिकृती आकर्षक पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. एसटीचा इतिहास आणि महामंडळाच्या विविध योजनांची माहिती प्रदर्शनात मांडली आहे.

\