गाजर वाटले: केसरकरांच्या घोषणा म्हणजे विकासाची गाजरे
सावंतवाडी ता.२१: नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात कोकणी जनतेला केवळ आश्वासने देऊन विकासाचे गाजर दाखवण्याचे काम करणाऱ्या अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांचा निषेध करण्यासाठी आज येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी शहरात बस स्थानक परिसरात गाजर वाटून निषेध केला.यावेळी केसरकरांनी केवळ करोडो रुपयांच्या घोषणा करून जिल्ह्यातील नागरिकांची बोळवण केली आहे,असा आरोप यावेळी करण्यात आला.
यावेळी परिवहन जिल्हाध्यक्ष अँड.राजू कासकर,जिल्हाकार्याध्यक्ष संतोष भैरवकर,तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे,तालुकासचिव विठ्ठल गावडे,म. न.वि. से.शहराध्यक्ष आशिष सुभेदार,म.न.वि.सेनेचे उपशहरअध्यक्ष ओंकार कुडतडकरम.न.वि.से उपतालुकाध्यक्ष संकेत मयेकर,म.न.वि.से विभागअध्यक्ष संकेत शेटकर,म.न.वि.से उपविभागअध्यक्ष गणेश नाईक,सागर कदम आदी उपस्थित होते.