आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड येथे विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

143
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

देवगड प्रतिनिधी
महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष देवगड तालुका यांच्या वतीने २३ जून रोजी तालुक्यात ठीक ठिकाणी विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.शिरगाव येथे रक्तदान शिबीर,लहान मुलांसाठी सायकल स्पर्धा, २३ जून रोजी सकाळी ९ ते १० या दरम्यान आमदार नितेश राणे इंद्रप्रस्थ सभागृह येथे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.किंजवडे येथे छत्र्या वाटप,शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप आदी कार्यक्रम होणार आहेत,इंद्रप्रस्थ सभागृहात सर्व आ नितेश राणे प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री संदीप साटम यांनी केले आहे.

\