जीवनात यशस्वी होण्यासाठी योग्य दिशेने वाटचाल करा

231
2

गणेश जेठे; वैभववाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

वैभववाडी ता.२१: जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा व मेहनत असली पाहिजे. यासाठी योग्य दिशेने वाटचाल केली पाहिजे. असे प्रतिपादन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनी व्यक्त केले.
कोकिसरे येथील माधवराव पवार विद्यालयात वैभववाडी पत्रकार संघाच्या वतीने दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहूणे वैभववाडी तहसिलदार रामदास झळके, माजी मुख्याद्यापक श्री. चव्हाण, अ. रा. विद्यालयाचे मुख्याद्यापक श्री. नादकर, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष उज्वल नारकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य एकनाथ पवार, वैभववाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष मारूती कांबळे, कोकिसरे विद्यालयाचे मुख्याद्यापक श्री. गोखले आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तहसिलदार झळके म्हणाले, दहावी व बारावी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून पुढील वाटचाल करावी. पालकांनीही पाल्यांची आवड काय आहे. हे पाहणे गरजेचे आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी मुलांना चांगले मार्गदर्शन करून इतरांचेही मार्गदर्शन घेतले पाहिजे. असे सांगितले.
गुणवंत विद्यार्थी भरपूर आहेत. पण दिशा, मार्गदर्शन देणारे कमी आहेत. विद्यार्थ्यांनी आपली कुवत ओळखूनच कोणतेही क्षेत्र निवडा. त्यामध्ये करिअरचे अनेक ठप्पे आहेत. योग्य दिशेने गेलात तरच तुम्हांला यश मिळेल. असे माजी मुख्याद्यापक श्री. चव्हाण यांनी सांगितले. यावेळी श्री. नादकर, मंदार चोरगे, श्री. कडू, पी. एन. साळुंखे, उज्वल नारकर तसेच विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दहावी, बारावी, शिष्यवृत्ती व नवोदय विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ करण्यात आला. यावेळी वैभववाडी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्रीधर साळुंखे, सहसचिव मोहन पडवळ, प्रकाश काळे, महेश रावराणे, किशोर जैतापकर, स्वप्नील कदम, प्रतिक खाड्ये, पंकज मोरे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. एस.एन. पाटील यांनी केले तर आभार मोहन पडवळ यांनी मानले.

फोटो- गणवंत विद्यार्थ्यांसमवेत मान्यवर.

4