कुडाळ येथे शिवसेनेच्यावतीने २३ जूनला गुणवंतांचा सत्कार…

142
2
Google search engine
Google search engine

कुडाळ, ता. २१ : शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून व कुडाळ तालुका शिवसेनेच्यावतीने कुडाळ तालुक्यातील शाळा, कॉलेजमध्ये दहावी, बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ २३ जून रोजी दुपारी ३ वाजता महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे
दहावी बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारावी. त्यांचा गुणगौरव करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा द्याव्यात जेणेकरून विद्यार्थी यातून प्रेरणा घेऊन आपले आयुष्य उज्ज्वल करतील या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले आहे.
या कार्यक्रमाला महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, जि. प. सदस्य संजय पडते, तालुका प्रमुख राजन नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, जि.प.सदस्य नागेंद्र परब , संजय भोगटे, संतोष शिरसाट, अतुल बंगे, अमर सावंत, राजन जाधव आदी उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार नाईक यांनी केले आहे.