सुनावणीवेळी गैरहजर राहणाऱ्या भूमिअभिलेख उपअधिक्षकांवर कारवाई करा

167
2
Google search engine
Google search engine

जेष्ठ नागरिक गोंविंद कामतेकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सिंधुदुर्गनगरी ता.२१: आपल्याला अपिलाच्या सुनावणीसाठी बोलावूनही स्वतः गैरहजर राहत सावंतवाडी भूमिअभिलेख अधिकारी यांनी आपले मानसिक आणि शारीरिक नुकसान केले असल्याचा आरोप कणकवली येथील जेष्ठ नागरिक गोविंद शंकर कामतेकर यांनी केला आहे. त्यामुळे सुनावणीसाठी बोलवुन स्वतः अनुपस्थित राहणाऱ्या भूमिअभिलेख अधिकऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करवाई अशी मागणीही कामतेकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे केली आहे.
मुळ कणकवली येथील आणि सद्या वास्तव्यास गोरेगाव मुंबई येथील गोविंद शंकर कामतेकर यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन सादर केले. त्यात आपल्याला आवश्यक असलेली माहिती माहितीच्या अधिकारात कणकवली भूमिअभिलेख कार्यालयात केली होती. मात्र ही माहिती मिळत नसल्याने त्यांनी कणकवली भूमिअभिलेख उपअधिक्षक तथा अपीलीय अधिकारी यांच्याकडे अपील केले होते. कणकवली भूमिअभिलेख उपअधिक्षक पद रिक्त असल्याने या पदाचा चार्ज सावंतवाडी भूमिअभिलेख उपअधिक्षकांकडे देण्यात आला आहे. त्यानुसार या उपधिक्षकांनी आपल्या अर्जावर गुरुवार २० जून रोजी दुपारी १२:१५ वा. सावंतवाडी भूमिअभिलेख कार्यालयात सुनावणी लावली होती. तसेच अपीलकार सुनवाणीच्या वेळी अनुपस्थित रहिल्यास एकतर्फी निर्णय दिला जाईल असा ईशारा पत्राद्वारे देण्यात आला होता. त्यानुसार कामतेकर हे मुंबईहुन रेल्वेला गर्दी असतानाही कसबसे सिंधुदुर्गात आले होते. कणकवली भूमिअभिलेख कार्यालयात अपील दाखल केले त्यानुसार ही सुनावणी कणकवली कार्यालयात होणे अपेक्षित होते. मात्र तरीही कणकवली भूमिअभिलेख उपअधिक्षक पदाचा पदभार असलेल्या सावंतवाडी भूमिअभिलेख उपअधिक्षकांनी सावंतवाडी कार्यालयात सुनावणी लावली. तरीही आपण तेथे सुनावणीसाठी वेळेत हजर राहिलो. मात्र तेथे गेल्यावर भूमिअभिलेख उपअधिक्षक कार्यालयात उपस्थित नसल्याचे कळले. मुळात अधिकारी स्वतः हजर राहणार नसल्यास अपील कर्त्याला आगावू सुचना देने आवश्यक असे असतानाही आपल्याला संबंधित कार्यालयाकडून कोणतीही कल्पना देण्यात आली नाही.
मुळात कणकवली भूमिअभिलेख कार्यलायत अर्ज केला असल्याने त्याच ठिकाणी सुनावणी लावणे आवश्यक होते तसे न करता सावंतवाडी कार्यालयात सुनावणी लावण्यात आली. तसेच संमधित भूमिअभिलेख उपअधिक्षक स्वतः गैरहजर राहत आपला मानसिक आणि शारीरिक नुकसान केले असल्याचा आरोप करत सुनावणीसाठी बोलवुन स्वतः अनुपस्थित राहणाऱ्या भूमिअभिलेख अधिकऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करवाई अशी मागणीही जेष्ठ नागरिक गोविंद कामतेकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे केली आहे.