वेंगुर्ले महिला काथ्या कारखान्यात योग दिन साजरा

2

वेंगुर्ले : ता. २१: श्री दत्त पद्मनाभ पीठ तपोभूमी गोवा, सद्गुरू योग गुरुकुल तसेच  महिला काथ्या वेंगुर्ला व संतसमाज गुळूदुवे, मळेवाड यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (२१ जून) आंतरराष्ट्रीय योगदिन वेंगुर्ला महिला काथ्या कारखाना येथे साजरा करण्यात आला.
महिला काथ्या कारखान्यात झालेल्या या कार्यक्रमात बोलताना एम के गावडे म्हणाले की आरोग्यदायी जीवनासाठी योग अत्यावश्यक आहे. हजारो वर्षापूर्वी हिंदुस्थानातील ऋषी मुनी यांनी योग साधना केली मात्र मधल्या वर्षात पश्चिमात्य संस्कृती जनतेने स्वीकारली व अमेरिका जर्मन मध्ये तयार झालेली औषधे संपूर्ण भारतात अलोपॅथी च्या नावावर विकली गेली. यामुळे माणसाच आरोग्य धोक्यात आले आहे. आयुर्वेद हे शाश्वत आरोग्य व त्याबरोबरच योगसाधना प्राणायम ही निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी योगाचार्य राजेश दळवी, दीपक केदार, साईदत्त नाईक यांनी उपस्थितांना योग बाबत माहिती देऊन प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी महिला काथ्या च्या संचालिका प्रज्ञा परब, धर्माजी बागकर, गुळूदुवे संत समाज अध्यक्ष रुद्रजी केदार, मळेवाड संत समाज अध्यक्ष दीनानाथ काळोजी, सचिव मनोहर केरकर, महिला प्रचारक भाविका काळोजी आदी उपस्थित होते.

15

4