पत्रकार पाल्यांच्या सत्काराची व्याप्ती वाढावी,मुख्यालय पत्रकार संघ कार्यक्रमात संजना सावंत यांचे आवाहन

203
2

सिंधुदुर्गनगरी / प्रतीनिधी
पत्रकारांचा हा कौटुंबिक कार्यक्रम आहे. हे या ठिकाणी पाऊल टाकताक्षणी लक्षात आले. पत्रकारांच्या मुलांचेही सत्कार होणे गरजेचे होते. त्याची सुरुवात मुख्यालय पत्रकार संघाने केली. ही चांगली गोष्ट आहे. मात्र पत्रकारांच्या गुणवंत मुलांच्या सत्काराची व्याप्ती भविष्यात वाढवावी, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी मुख्यालय पत्रकार संघ आयोजित गुणवंत पाल्य सत्कार कार्यक्रमात बोलताना शुक्रवारी केले.
मुख्यालय पत्रकार संघाच्या वतीने मुख्यालय पत्रकार संघाच्या सदस्यांच्या गुणवंत मुलांचा गुणगौरव सोहळा सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज समिती सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष सौ संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष बाळ खडपकर, सहसचिव देवयानी वरसकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सौ सावंत यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी बोलताना जेठे यांनी, आपल्या मुलांचा सत्कार करण्याचे मुख्यालय पत्रकार संघाचे नियोजन स्तुत्य आहे. यावेळी मुख्यालय पत्रकारांचे कुटुंब उपस्थित राहिल्याने या कार्यक्रमाला कौटुंबिक सोहळ्याचे स्वरूप आले आहे, असे सांगितले. यावेळी खडपकर, सौ वरसकर यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप गावडे यांनी करताना मुख्यालय पत्रकार सामाजिक बांधिलकी जपून राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. तसेच पाल्य सत्कार मागचा उद्दिष्ट विषद केला. यावेळी पदवीधर वृषभ आयरे, बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सिद्धेश वालावलकर, अनुज जेठे, अस्मिता म्हाडेश्वर, दहावी उत्तीर्ण युतीका वालावलकर यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. तसेच जलतरणमध्ये लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या पूर्वा गावडे हिचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. जेठे यांच्याहस्ते अध्यक्षा सौ सावंत यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्यालयातील नंदकुमार आयरे, संजय वालावलकर, दत्तप्रसाद वालावलकर, लवू म्हाडेश्वर, गिरीश परब, मनोज वारंग, विनोद परब, सतीश हरमलकर, तेजस्वी काळसेकर, रवी गावडे, गुरुप्रसाद दळवी हे पत्रकार आपल्या कुटुंबासह उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद दळवी यांनी केले. आभार संजय वालावलकर यांनी मानले. मुख्यालय पत्रकार संघाने केलेला सत्कार आम्हाला ऊर्जा देणारा असल्याचे यावेळी युतीका वालावलकर हिने सांगितले.

4