पंधरा दिवसात सकारात्मक अहवाल देण्याचे महसूल मंत्र्यांच्या आदेश
मुंबई ता.२१: आंबोली-चौकुळ ग्रामस्थांना भेडसावणारा कबुलायतदार गावकर प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.लोकांची मागणी लक्षात घेता स्मशानभूमी पर्यटन तसेच अन्य शासकीय जागा सोडून उर्वरित जागा समान वाटप करून देण्यात यावी ही मागणी शासनाने स्वीकारली आहे.तसेच पंधरा दिवसात याबाबतचा सकारात्मक निर्णय घेण्यात यावा आणि तसा अहवाल आपल्याला सादर करण्यात यावा अशा सूचना खुद्द महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत.पंधरा दिवसांनी पुन्हा जिल्ह्यात जाऊन राज्यमंत्री श्री.रवींद्र चव्हाण यांनी आढावा घ्यावा अशा सूचना सुद्धा यावेळी देण्यात आल्या. त्यामुळे गेली अनेक वर्षे रेंगाळलेला हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
या प्रश्नाबाबत आज विधान भवनात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर,राज्यमंत्री रवींद्र चव्हाण,माजी आमदार राजन तेली,तालुकाध्यक्ष महेश सारंग,दादू कविटकर,शशिकांत गावडे,तहसीलदार राजाराम म्हात्रे, बाळा पालयेकर,राजेश गावडे,शैलेश गावडे,उल्हास गावडे, गुणाजी गावडे, भारतभूषण गावडे ,जगन्नाथ गावडे ,विलास गावडे ,श्रीकांत गावडे,अविनाश गावडे,आनंद गवस आदी उपस्थित होते.यावेळी आंबोली,गेळे व चौकुळ या तिन्ही गावाचे वेगवेगळे जीआर काढून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे पाटील यांनी सांगितले.