बांदयातील युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

2

बांदा/प्रतिनिधी
बांदा-पानवळ येथील विराज हडफडकर (वय १६) या युवकाचे भाजल्याने उपचार सुरू असताना आज सकाळी गोवा-बांबोळी रुग्णालयात निधन झाले.यात तो ७० टक्के भाजला होता.
हा प्रकार कल रात्री घडला. त्याला उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. नंतर रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली. उपचार करण्यासाठी तब्बल दोन तास लोटले. त्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र आज सकाळी उपचार सुरू असताना त्याचे दुर्दैवी निधन झाले.

4