Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
कै.नाईक यांचा २८ वा स्मृतिदिन कणकवलीत संपन्न…
- कणकवली, ता.२२ : कै. श्रीधर नाईक यांनी समाजकारणातून समाजात आपला वेगळा ठसा उमटवला होता.अल्पवयात श्रीधर नाईक यांनी वैचारिक श्रीमंती कमावली होती.श्रीधर नाईक यांची राजकीय हत्या झाली आणि समाजसेवेचा हिरा दुर्दैवाने आपल्यातून गेला. त्यांनी सामाज सेवेचा जो मार्ग दाखवला त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. कै. श्रीधर नाईक यांच्या कुटुंबानेही समाजसेवेचा वसा जोपासला आहे.त्याच्या मुलांना नेहमी त्यांचे आशीर्वाद लाभोत असे प्रतिपादन रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी केले आहे. कै.श्रीधरराव नाईक यांचा २८ वा स्मृतिदिन शुक्रवारी संपन्न झाला.प्रथमतः नरडवे रोड येथील कै श्रीधर नाईक यांच्या पुतळ्यास खा. विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शहरातील श्रीधर प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात रक्तदान शिबिर आणि शेतकरी मेळावा कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी कै श्रीधर नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले , गेली अनेक वर्षे जिल्ह्यातील जनतेने नाईक कुटुंबियांना आधार दिला आहे. जनतेने दिलेला हा आधार, आशीर्वाद आम्हाला समाज कार्याची उर्मी देतो. कै. श्रीधर नाईक यांनी केलेल्या समाजकार्यातून तरुणांची फळी निर्माण केली होती. वयाच्या १८ व्या वर्षीपासून स्वतः कै. श्रीधर नाईक रक्तदान करत होते. त्याचा हा वारसा आम्ही चालू ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत.त्यांनी दिलेल्या राजकीय सामाजिक दिशेप्रमाणे या पुढील काळात देखील सामाजिक कार्य करण्याची ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी देत निबंध आणि चित्रकला स्पर्धेतुन यशस्वी स्पर्धक भविष्यात मोठे लेखक आणि चित्रकार बनतील असा विश्वास व्यक्त केला.
संदेश पारकर म्हणाले, लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्यांनी श्रीधर नाईक यांची हत्या केली स्वतःचे अस्तित्व नाहीसे होईल या भीतीने झालेली हि सिंधुदुर्गातील पहिली राजकीय हत्या आहे. श्रीधर नाईक हे समाजसेवेतील अग्रणी नाव होते.श्रीधर यांच्या हत्येने नाईक कुटुंबियांइतकेच समाजाचेही नुकसान झाले आहे. खासदार विनायक राऊत यांनी दुसऱ्यांदा विजयी होत श्रीधर नाईक यांची हत्या करणारी जुलमी राजकीय शक्ती संपवण्याचे काम केले.असे त्यांनी सांगितले.
यावेळी अतुल रावराणे यांनी समाजसेवेतून कै श्रीधर नाईक यांच्या स्मृती नाईक कुटुंबीयांनी जागृत ठेवल्या आहेत. कै. श्रीधर नाईक यांचे योगदान कणकवलीच नव्हे तर जिल्ह्याच्या स्मरणात कायम राहील असे सांगितले.
याप्रसंगी कै. श्रीधरराव नाईक फाउंडेशन व कृषी विज्ञान केंद्र सिंधदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना चांदीचे मेडल देऊन गौरविण्यात आले. दहावी परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या दिव्या राणेचा खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते चांदीचे मेडल, शाल, श्रीफळ देत विशेष सत्कार करण्यात आला. कणकवली तालुक्यातील ५० गुणवंत विद्यार्थ्यांना चांदीचे मेडल देऊन गौरविण्यात आले. यावेळी नगरसेवक सुशांत नाईक, सतीश नाईक , संकेत नाईक, शिवसेना महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, नीलम पालव, जि.प.सदस्य नागेंद्र परब, प्रदीप सावंत, अशोक करंबेळकर, रुपेश नार्वेकर, डॉ.चंद्रकांत राणे, डॉ. तुळशीराम रावराणे, डॉ गीते, दादा कुडतरकर, राजू शेटये, श्री वाळके, प्रतीक्षा साटम, तेजल लिंग्रज, शैलेश भोगले,प्रथमेश सावंत सुजित जाधव, गीतेश कडू, सुदाम तेली, छोटू पारकर, श्री सावंत यांच्यासह शेकडो श्रीधर नाईकप्रेमी, विद्यार्थी उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.