स्थानिकांचा विरोध असेल तर नाणारला आमचाही विरोध

138
2
Google search engine
Google search engine
Google search engine

अनंत गीते : शिवसेनेची भूमिका यापूर्वीच ठरलेली

रायगड ता.२२: येथील स्थानिक जनतेला नाणार प्रकल्प नको असेल तर आम्ही त्यांच्या बाजूने राहू, शिवसेनेने नाणार विरुद्ध यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.त्यामुळे प्रदूषणकारी प्रकल्प लोकांच्या माथी मारणार नाही अशी भूमिका शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार अनंत गीते यांनी मांडली आहे.
सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर होणारा नाणार प्रकल्प तेथिल विरोधामुळे अखेर रायगडात हलवण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी केली आहे. परंतु रायगडमध्ये प्रकल्प येणार असल्याची कळतात तेथील जनतेने या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे शेकापचे आमदार जयंत पाटील व सामाजिक कार्यकर्त्या उल्काताई महाजन यांनी सुद्धा याला विरोध दर्शविला आहे.
दिवसेंदिवस हा विरोध वाढत आहे अशा परिस्थितीत श्री गीते यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार लोकांना जर प्रकल्प नको असेल तर असा प्रदुषणकारी प्रकल्प या ठिकाणी आम्ही होऊ देणार नाही.या बाबत आपण स्थानिक लोकांसोबत राहू. शिवसेनेने यापूर्वीच भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यामुळे वेगळी भूमिका मांडण्याची गरज नाही.मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प रायगडमध्ये येणार आहे असे सांगितले परंतु नेमका हा प्रकल्प कोठे होईल हे सांगितले नाही. त्यामुळेच आत्ताच बोलणे योग्य ठरणार नाही.

\