कुडाळ ता.२२: सिंधुदुर्ग जिल्हा बँक,श्री गणेश मूर्तिकार संघ सिंधुदुर्ग आणि भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय इको फ्रेंडली गणेश मुर्ती स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.येथील वासुदेवानंद सभागृहात या प्रदर्शनाला आज शनिवार दि.२२ जून पासून सुरुवात झाली असून उद्या सायंकाळ पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.
कोकणातील संस्कृती तसेच पर्यावरण जोपासणे हा या प्रदर्शना मागचा मुख्य हेतू आहे.या स्पर्धेत मोठ्या संख्येने गणेश मूर्तिकार सहभागी झाले असून आकर्षक मुर्त्या या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.या प्रदर्शनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा गणेश मुर्ती संघाचे अध्यक्ष नारायण सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली आहे.तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.