वागदेतील १५० मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप…

132
2
Google search engine
Google search engine

विनसन क्रीडा मंडळाचा सलग पाचव्या वर्षी उपक्रम;२३ जणांना छत्र्या ,१० गुणवंतांचा सत्कार…

सिंधुदुर्गनगरी ता.२२: विनसम क्रीडा मंडळाच्या वतीने सोमवारी वागदे गावातील तब्बल १५० विद्यार्थ्याना मोफत वह्या, पेन, कंपास पेटी, वाॅटर बॅग तसेच २३ गुणवंत विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप व दहावी व बारावीच्या १० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. उन्हाची तमा न बाळगता टेनिस क्रीकेट स्पर्धेतील बक्षीसांच्या माध्यमातून गोळा केलेला पैसा विनसम क्रीडा मंडळ गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांवर खर्च करतेय अभिमानाची बाब आहे. या मंडळाचे सामाजिक योगदान वाखाणण्याजोगे आहे. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात झोकून दिल्यास यश दुर नाही, असे प्रतिपादन वागदे गावचे उपसरपंच संतोष गावडे यांनी केले.
वागदे शाळा नंबर १ येथे विनसम क्रीडा मंडळाच्या वतीने मोफत वह्या व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. एकीकडे शासनातर्फे विद्यार्थांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरु आसताना कणकवली तालुक्यातील सामाजीक व शैक्षणिक क्षेत्रात योगदान देण्यात अग्रेसर असलेल्या वागदे येथील विनसम क्रीडा मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षीही सामाजिक बांधीलकी जपत वागदे शाळा नंबर १, आर्यादुर्गा शाळा, मांगरवाडी शाळा, डंगळवाडी शाळा, देऊळवाडी शाळा या जिल्हापरीषद शाळेतील १५० विद्यार्थ्यांना सहाशे वह्या, वाॅटर बॅग, कंपास पेटी, पेन, प्रथम क्रमांक पटकाविलेल्या २१ विद्यार्थ्यांना छत्र्या वाटप, दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम देवून गौरविण्यात आले.
यावेळी विनसमचे निलेश काणेकर, सुधीर जाधव, सुरेंद्र कदम, गणेश गावडे, अशोक तांबे, दिलीप सरंगले, सागर गावडे, शेखर गावडे, दिपक चव्हाण, ओमकार गोलतकर, संदेश परब, प्रदीप गावडे, सचिन आलव, राजू तावडे, गोट्या गावडे, गितेश लाड, सुयोग गावडे, बंटी गावडे, निलेश पालव, सुरज गावडे, लवू ताटे, अंकुश ताटे, वैभव आलव, देवेश गावडे, जितेंद्र गावडे, किरण ताटे, गिरीश परब, मुख्याध्यापिका श्रीमती परब, शिक्षक बाबासाहेब खेडेकर उपस्थित होते.
विनसम क्रीडा मंडळाच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून वागदे गावातील विद्यार्थ्यांना मोफत वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जात आहे. क्रिकेटच्या स्पर्धा खेळून त्या माध्यमातून जो पैसा गोळा होतो तो सामाजिक कार्यासाठी सत्कारणी लावण्याचा मानस या मंडळाचा आहे. या उपक्रमाबरोबरच दरवर्षी स्वच्छता मोहीम राबवणे, बंधारे बांधणे यासारखे सामाजिक उपक्रम राबवून या मंडळाने समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे असे मत मुख्याध्यापिका परब यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबलू परब यांनी केले. आभार गणेश गावडे यांनी मानले.