डाॅ. रा. धो. खानोलकर हायस्कूल मठ येथे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

2

वेंगुर्ले : ता.२२ : तालुक्यातील मठ ग्रामपंचायत हद्दीत डाॅ. रा. धो. खानोलकर हायस्कूल मध्ये दहावीतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी शाळेमध्ये प्रथम आलेल्या पाच विद्यार्थ्यांना भाजपा तालुकाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांनी स्कूल बॅग व डीशनरी भेट देऊन त्यांचा सत्कार केला.
शाळेतील या कार्यक्रमाला मठ गावचे सरपंच तुळसीदास उर्फ दादा ठाकुर, मुख्याध्यापक सुनील जाधव, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र खानोलकर, शिक्षक पालक संघाच्या मांजरेकर मॅडम , गोंधळी सर, राजु मोबारकर तसेच शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपली मनोगते मांडली. तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रसंन्ना देसाई म्हणाले की यशाचे सातत्य टिकवण्यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे . स्पर्धेच्या जगात टिकण्यासाठी कष्ट व चिकाटीची आवश्यकता आहे. आपण कीतीही मोठे झालो तरी शाळेचे ॠण विसरु नका असे सांगितले.

15

4